Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी
साहित्य :
१ कप व-याचे तांदूळ ( भगर )
२ १/२ कप पाणी
१/२ टीस्पून जिरे
२ हिरव्या मिरच्या
२ टेबलस्पून तूप
कृती :
१. व-याचे तांदूळ धुवून घ्या. कढईत तूप गरम करा आणि जिरे आणि मिरची (तुकडे करून) फोडणीला घाला.
२.मिरची पांढरी झाली कि धुतलेली वरई घालून ३-४ मिनिटे परता. तांदूळ सुट्टा झालाय असा वाटला कि २ १/२ कप (तांदुळाच्या अडीच पट) पाणी घाला.मीठ घालून ढवळा.
३. वरून झाकण ठेवून शिजवा. पाणी पूर्ण आटलं कि झाकण काढून पुन्हा एकदा परतून घ्या. आणि दाण्याच्या आमटी बरोबर सर्व्ह करा.
टीप: हा भात कुकर मध्ये शिजवला तर गिच्च होतो. भात गॅसवरच शिजवावा. म्हणजे मोकळा होतो.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!