कोलंबी बिर्याणी-Prawn Biryani

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ ते ५ माणसांसाठीसाहित्य:
१५-२० मध्यम आकाराच्या कोलंबी
२ बटाटे चकत्या करून 


भातासाठी-
२ कप बासमती तांदूळ
४ कप पाणी
सगळा खडा मसाला (३-४ लवंग, २ वेलदोडे, ३-४ मिरी , तमालपत्र, १" दालचिनी)
ग्रेवीसाठी -१ १/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट (आलं-लसूण सारख्या प्रमाणात)
१ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला
१ १/२ टीस्पून लाल तिखट 
१/२ टीस्पून हळद 
बिर्याणीसाठी मसाला- १ टीस्पून जिरे+ १" दालचिनी +१/२ टीस्पून शहाजिरे + ३-४ मिरी+ २ वेलची+ २ चिमुट जायफळ पावडर + १/४ टीस्पून जायपत्रीची पावडर + ३ लवंगा+१/२ लाल तिखट+ १ तमालपत्र + १ टीस्पून धने+ १/२ कसुरी मेथी+१ मसाला वेलची - हा सगळा मसाला कच्चा भाजून घ्या आणि मिक्सरवर वाटून त्याची बारीक पूड करा.(१ १/२ ते २ टीस्पून रेडीमेड बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल.)
तळण्यासाठी- १ कप उभा चिरलेला कांदा , ८- १० काजू, १०-१२ बेदाणे
तेल
मीठ चवीप्रमाणे

कृती :
१. सर्व प्रथम तांदूळ १० मिनिटे आधी धुवून ठेवा. पातेल्यात 3 टेबलस्पून तेल घालून ते गरम होऊ द्या.तेलात खडा मसाला फोडणीला टाकून धुतलेले तांदूळ घाला आणि २-३ मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाले कि, तांदुळाच्या दुप्पट (इथे 3 कप) गरम पाणी घाला. मीठ घालून ढवळा वरून झाकण ठेवा आणि भात पूर्ण शिजू दे.
२. भात पूर्ण शिजला कि झाकण काढून ठेवा. भात थंड होऊ दे. क्त चमच्याने भात वर खाली करा म्हणजे भाताचे शीत मोडणार नाही. आणि भात छान मोकळा होईल.
३. बटाट्याची साले काढून त्याच्या चकत्या करा. त्याला मीठ थोडी हळद आणि थोडे तिखट लावून ठेवा.एकीकडे कढईत पुरेसे तेल गरम करा. तेलात काजू आणि बेदाणे टाळून घ्या. काजू-बेदाणे लगेच ब्राऊन होतात.जास्ती वेळ तळू नका नाहीतर करपतील.
४. नंतर तळायचा कांदा (उभा चिरलेला) छान ब्राऊन होई पर्यंत टाळून घ्या.म्हणजे कुरकुरीत होईल.जास्ती काळा करू नका. उरलेले तेल नंतर ग्रेवीसाठी त्याच्यातच ठेवून द्या.
५.कढईत उरलेले तळणीचे तेल गरम करा.त्यात आलं-लसूण पेस्ट घाला. छान वास आलं कि कांदा घालून २-३ मिनिटे परता. टोमॅटो ,लाल तिखट ,हळद, बिर्याणी मसाला घालून तेल सुटे पर्यंत परता. मग कोलंबी घालून परता. मीठ घालून ढवळा १ कप पाणी घाला.आणि झाकण ठेवा. ५-१० मिनिटे कोलंबी शिजू द्या.
६.ग्रेवी तयार झाली कि, वेगळ्या पातेल्यात आतून तुपाचा हात लावून घ्या.
७. नंतर पातेल्यात सर्वात खाली बटाट्याच्या चकत्या लावा.त्याच्या वर भाताचा थोडा जाड थर करा.त्यावर तळलेला कांदा, काजू, बेदाणे घाला. वरती थोडी ग्रेवी घाला. मग परत भाताचा थर.वरती कांदा, काजू बेदाणे, वरती ग्रेवीचा थर. असे एकावर एक थर करा.सर्वात वरती भाताचा थर आला पाहिजे. त्यावर तळलेला कांदा,काजू बेदाणे, कोथिंबीर घालून सजवा.
८. पातेले १५ मिनिटे बारीक गॅस वर ठेवा. वरून झाकण ठेवा. वाफेने तळाचे बटाटे शिजतील. मग बिर्याणी तुम्ही सर्व्ह करू शकता.

8 comments:

 1. kup chan me nakki karun pahin

  vandana

  ReplyDelete
 2. thanks Vandana..ho nakki karun bagh ani mala kalvayla visru nakos :)

  ReplyDelete
 3. he sarv chikan sarkhech aahe na?

  ReplyDelete
 4. mast tondala paani sutala...
  mi tar aatach karayla ghete....

  ReplyDelete
 5. Pahunach tondala pani sutata !

  Nice dish, one of my favoriate !

  ReplyDelete
 6. Sundar. Chavisht aahe karun pahili. Thanks

  ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!