सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
साहित्य:
१/२ कप कडवे वाल (मोड आल्यावर साधारण १ १/२ कप होतील )
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
९-१० मिरी,ठेचून
७-८ लसूण पाकळ्या,ठेचून/चिरून
१/२ कप खवलेलं ओलं खोबरं
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१ टेबलस्पून गुळ, किसलेला
३ आमसुलं / १/२ टीस्पून चिंचेचा कोळ
मीठ चवीप्रमाणे
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तेल
पूर्व तयारी: वाल १०-१२ तास पाण्यात भजत घाला. भिजलेले वाल १८-२० तास चाळणीत उपसून एखाद्या उबदार जागी ठेवा म्हणजे त्याला लांब मोड येतील.
चं लांब मोड आले कि वाल गार पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे त्याची साले निघून येतील. वालाची साले काढून वाल सोलून घ्या.
कृती:
१. पातेल्यात तेल गरम करा. तेल चांगले तापले कि, लसूण फोडणीला घाला. लसूण गुलाबी झाली मग कांदा घालून परता. मिरी ठेचून घाला. ३-४ मिनिटे कांदा परतून घ्या.
२. सोललेले वाल घाला. दीड ते पावणे दोन कप पाणी घाला आणि झाकण ठेवून साधारण २५-३० मिनिटे शिजवत ठेवा.
३. वाल पूर्ण शिजले कि, हळद,तिखट ओलं खोबरं आणि मीठ घाला. ढवळून ३-४ मिनिटे उकळत ठेवा.
४. सर्वात शेवटी गुळ आणि आमसुलं घाला. झाकण ठेवून ७-८ मिनिटे शिजवत ठेवा. वरून कोथिंबीर घाला आणि पोळी बरोबर सर्व्ह करा.
my fav.................
ReplyDelete