ताज्या नारळाचं दुध २ कप
४-५ सोलं (आमसुलं/ कोकम )
१ हिरवी मिरची
१ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
१-२ लसूण पाकळ्या (Optional )
१ १/२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
कृती :
१. १ कप ताज्या खोब-याचे तुकडे आणि १ कप पाणी मिक्सर किंवा ब्लेंडर मध्ये घालून त्याची प्युरी करा. सुती कपड्यातून हि प्युरी गाळुन घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दुध काढा. तोच चोथा पुन्हा थोड्या पाण्यात घालून याच पद्धतीने दुध काढा. साधारण एका नारळातून २ १/२ कप दुध निघतं. उरलेला चोथा फेकून द्या. रेडीमेड कोकोनट मिल्क वापरणार असाल तर १ कप कोकोनट मिल्क घ्या आणि त्यात १ कप पाणी घालून पात्तळ करून घ्या.
२. पाण्यात सोलं ३०-३५ मिनिटे भिजत घाला म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल. अर्ध्या तासाने कोकमाचं पाणी नारळाच्या दुधात घालून कोकम बाजूला काढून ठेवा.
३. नंतर साखर मीठ घालून ढवळून घ्या. हिरवी मिरची तुकडे करून घाला.लसूण ठेचून घाला. वरून कोथिंबीर बारीक चिरून घाला आणि तयार कढी फ्रीज मध्ये ठेवून थंडगार serve करा.
टीप: हि कढी पाचक असून नुसती प्यायला किंवा भातावर घ्यायला छान लागते. कोकणात मासे किंवा चिकन-मटणचा बेत असेल तर हमखास सोलकढी करतात.
good
ReplyDeleteCan we add ginger to it ?
ReplyDeleteI never tried ginger in Sol kadhi but I think it won't tastes good with ginger.
ReplyDeleteI am from Konkan and my grandma used to make this Kadhi.everyone at my home like this Kadhi very much.
ReplyDeleteSharada
Such an easy way to make it :)
ReplyDelete