व्हेज बिर्याणी- Vegetable Biryani

Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी


साहित्य :
भातासाठी-
१ १/२ कप बासमती तांदूळ
३ कप पाणी
सगळा खडा मसाला (३-४ लवंग, २ वेलदोडे, ३-४ मिरी , तमालपत्र, १" दालचिनी)
रस्सा भाजी साठी -
मसाला वाटण १ :- १" आले, ४-५ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, १/२ कप चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून खसखस
मसाला वाटण २ :- १ टीस्पून धने, १ टीस्पून शहाजिरे / जिरे, ३-४ लवंगा, ५-६ काळी मिरी, १' दालचिनीचा तुकडा
तळण्यासाठी- १ कप उभा चिरलेला कांदा , ८- १० काजू, १०-१२ बेदाणे
भाज्या -१ कप बारीक चिरलेला कांदा, फ्लॉवरचे ६-७ तुरे, १/४ कप मटार, १/४ कप बटाट्याच्या चोकोनी फोडी
१/४ कप उभे चिरलेले गाजर, १/४ कप सिमला(भोपळी) मिरचीचे चौकोनी तुकडे,
१ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला
१ तमालपत्र
३ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे
केवडा इसेन्स
केशर चिमुटभर आणि ४ टेबलस्पून दुध


कृती :
१. सर्व प्रथम तांदूळ १० मिनिटे आधी धुवून ठेवा. पातेल्यात २ टेबलस्पून तेल घालून ते गरम होऊ द्या.तेलात खडा मसाला फोडणीला टाकून धुतलेले तांदूळ घाला आणि २-३ मिनिटे परता. तांदूळ सुटसुटीत झाले कि, तांदुळाच्या दुप्पट (इथे २ १/२ कप) गरम पाणी घाला. मीठ घालून ढवळा वरून झाकण ठेवा आणि भात पूर्ण शिजू दे.
२. भात पूर्ण शिजला कि झाकण काढून ठेवा. भात थंड होऊ दे. म्हणे नंतर थर करताना मोकळा होईल.
३ . एकीकडे कढईत तेल गरम करा. तेलात काजू आणि बेदाणे टाळून घ्या. काजू-बेदाणे लगेच ब्राऊन होतात.जास्ती वेळ तळू नका नाहीतर करपतील.
४. नंतर तळायचा कांदा (उभा चिरलेला) छान ब्राऊन होई पर्यंत टाळून घ्या.म्हणजे कुरकुरीत होईल.जास्ती काळा करू नका. उरलेले तेल नंतर रस्सा भाजी साठी त्याच्यातच ठेवून द्या.
५. खसखस गरम पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवा. म्हणजे ती शिजेल.
६. मसाला वाटण no.१ मिक्सरवर बारीक वाटून घ्या.
७. मसाला वाटण no.२ ची बारीक powder करून घ्या.
( readymade गरम मसाला powder १/४ च. वापरली तरी चालेल.)
८. तळणीच्या तेलात तमाल पत्र फोडणीला घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
९. मग मसाला वाटण no.१ घालून परता. खमंग वास सुटला कि. मसाला वाटण no.२ घालून परता.
१०. १-२ मिनिटे परतल्यावर हळद मीठ घाला.आणि टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता.
११. मग बटाटा ,फ्लॉवर, गाजर, मटार, सिमला मिरची अनुक्रमे घालून १ १/२ कप पाणी घाला.
१२. वरून झाकण ठेऊन भाज्या छान शिजू द्या.
१३. रस्सा तयार झाला कि, वेगळ्या पातेल्यात आतून तुपाचा हात लावून घ्या. १ टेबलस्पून कोमट दुधात केशर खलून ठेवा.
१४. नंतर पातेल्यात सर्वात खाली भाताचा थर करा.त्यावर तळलेला कांदा, काजू, बेदाणे घाला. वरती भाजीचा थर करा. मग परत भाताचा थर.वरती कांदा काजू बेदाणे, वरती भाजीचा थर. असे एकावर एक थर करा.सर्वात वरती भाताचा थर आला पाहिजे. त्यावर तळलेला कांदा,काजू बेदाणे, कोथिंबीर घालून सजवा.
१५. थरांना चमच्याच्या दांड्याने वेगवेगळ्या जागी ३-४ छोटी भोकं पाडा.
 त्यातून केशरी दुध आणि १ झाकण केवडा इसेन्स घाला.
१६. भोक बुजवा आणि झाकण ठेऊन १-२ वाफा काढा.
१७.बिर्याणी उभा डाव घालून. थर न मोडता वाढा.

टिप : मायक्रोवेव ओव्हन असेल काचेच्या भांड्यात थर करावेत म्हणजे काम सोपे होते.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!