साहित्य :
१ जुडी पालक ( २०० ग्रॅम)
१ कप पाणी
५० ग्रॅम पनीर
१/२ कप किसलेला / बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
२ चिमुट गरम मसाला
१-२ हिरव्या मिरच्या
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून धनेपूड
१/४ टीस्पून जिरेपूड
१/४ टीस्पून आमचूर
१ टेबलस्पून दही
१ टेबलस्पून चीज (optional )
२ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे
कृती :
१. पालकाची पाने खुडून स्वच्छ धुवून घ्या.
२. १ कप पाणी पातेल्यात उकळायला ठेवा. पाणी उकळले कि त्यात पालकाची पाने घाला. चिमुटभर मीठ घाला.५ मिनिटे पाने पाण्यात शिजू द्या.
३.शिजलेला पालक (उरलेल्या पाण्या सकट) आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घ्या.
४. पनीरचे चौकोनी तुकडे करून ठेवा . १ चमचा बेसन किंवा तांदळाच्या पिठात २ चमचे पाणी घाला. आणि त्या मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवा आणि थोड्याश्या तेलात पनीर शालो फ्राय करून बाजूला ठेवून द्या.
५. पातेल्यात तेल गरम करा. त्यात आलं-लसूण पेस्ट घाला. खमंग वास सुटला कि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
६. मग धने-जिरे पूड ,गरम मसाला आणि १/४ चमचा हळद घालून परता.
७. वाटलेला पालक घाला. आमचूर घालून एक उकळी काढा.
८.हवे असल्याच किंचित पाणी घाला.आणि मग १ टेबलस्पून दही घालून नीट ढवळा.
९. १ टेबलस्पून किसलेले चीज घाला.
१०. सर्व्ह करायच्या १० मिनिटे आधी पनीर घाला.पनीर आधी घातले तर लगदा होऊन पनीर मोडण्याची शक्यता असते.
please send it to me
ReplyDeletethanks Megal :)
ReplyDeletetahnks for these all beautiful and tasty recepies.
ReplyDeleteThanks Sonal :)
ReplyDeleteLooks like you are an amazing cook!!!
ReplyDeleteHi Kalyani,
ReplyDeletePalan paneer bhaji kadu hou naye ya sathi kahi tips.