साहित्य :
१०० ग्रॅम भेंडी (अंदाजे २० - २५ भेंडी)
१ कप दही
१/४ टीस्पून चाट मसाला
३/४ टीस्पून साखर
१/४ टीस्पून मीठ
१-२ हिरव्या मिरच्या
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
५-६ कढीपत्ता पाने
फोडणीसाठी १ टेबलस्पून तेल
भेंडी तळण्यासाठी तेल
कृती :
१. भेंडी धुवून कापडाने कोरडी करून घ्या.मग त्याचे १/२" लांबीचे तुकडे करा.
२. कढईत तेल गरम करा आणि भेंडी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या.
३. बाउल मध्ये दही घोटून घ्या. त्यात मीठ,साखर चाट मसाला घालून नीट ढवळून घ्या.
४. फोडणीच्या कढईत तेल गरम करा. तेल कडकडीत तापले कि मोहरी घाला.
मोहरी तडतडली कि हिरवी मिरची कढीपत्ता आणि हिंग घालून दह्याला फोडणी द्या.
५. सर्व्ह करायच्या वेळेस, तळलेली भेंडी दह्यात घालून मिक्स करा.
khup chan!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ReplyDelete