साहित्य :
२ कप चिरलेली मेथी
१/२ कप तुरीची डाळ
१-२ हिरव्या मिरच्या
२ टीस्पून ओलं खोबरं
१/४ टीस्पून हळद
१/४ कप दह्याचे आंबटसर ताक
मीठ चवीप्रमाणे
फोडणीसाठी- १ टेबलस्पून तेल + ५-६ लसूण पाकळ्या
कृती:
१. तुरीची डाळ धुवून घ्या. कुकरमध्ये १ १/२ कप पाणी घालून तुरीची डाळ, मेथी आणि हिरवी मिरची असे एकत्र शिजवून घ्या.
२. कुकर सुटला कि डाळ-मेथी एकत्र घोटून घ्या. त्यात हळद आमचूर, मीठ, ओलं खोबरं घालून उकळी काढा.
३. फोडणीच्या कढईत तेल कडकडीत गरम करा आणि त्यात लसूण उभी चिरून किंवा ठेचून घाला.लसूण गुलाबी रंगाची झाली कि डाळ-मेथी मिश्रणाला वरून फोडणी द्या.
४. सर्व्ह करायच्या वेळेस त्यात ताक घालून द्या.
टीप : ताक आवडत नसल्यास; ताकाच्या ऐवजी २ सोलं किंवा आमचूर घातलं आणि वरून हिंग मोहरीची फोडणी दिली तरी खूप छान स्वाद येतो.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!