चिकन बोटी कबाब - Chicken Boti kebab

A tangy and spicy dry chicken preparation
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य :
४०० ग्रॅम बोनलेस चिकन
१ १/२ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
१ टीस्पून धनेपूड
२ टेबलस्पून लिंबू रस
२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीप्रमाणे
शालो फ्राय करण्यासाठी तेल

कृती :
१. चिकनचे १ १/२''  लांबीचे तुकडे करा.
२. चिकनला, आलं-लसूण पेस्ट, धनेपूड, लिंबू रस, लाल तिखट, हळद, मीठ लावून ४-५ तास मॅरीनेट करून फ्रीजमध्ये ठेवा. 
३.  एका  मोठ्या खोलगट पॅन मध्ये तेल गरम करा आणि चिकनचा एक एक तुकडा सगळ्या बाजूनी शालो फ्राय करून घ्या.
४. साधारण ८-१० मिनिटात चिकन व्यवस्थित शिजेल.
५. गरम गरम कबाब डिश मध्ये कांदा आणि कोबीच्या सलाड बरोबर सर्व्ह करा.

2 comments:

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!