साहित्य:
१/२ कप तांदूळ
१/२ कप तुरीची डाळ
४-५ काजू
१/४ कप शेंगदाणे
१ कप बारीक चिरलेला कांदा
१ छोटं वांगं (४ फोडी करा)
२ भेंडी (२" तुकडे करून)
गाजराचे ५-६ मध्यम आकाराचे तुकडे
३-४ फरजबी २" लांब चिरून
फ्लॉवरचे ३-४ तुरे
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
४ टीस्पून बिसिबेल्ले भात पेस्ट (मी MTR ची वापरते)
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ चवीप्रमाणे
१/४ टीस्पून मोहरी
४-५ कढीपत्ता पाने
२ टेबलस्पून तेल
कृती:
१. कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ एकत्र करून नेहमी सारखे शिजवून घ्या. शिजवताना कुकरमध्ये काजू आणि शेंगदाणे घाला.
२. पातेल्यात तेल गरम करा आणि कांदाकांदा फोडणीला घाला कांदा गुलाबीसर झाला कि हळद ,२ टीस्पून बिसिबेल्ले पेस्ट, १/२ टीस्पून मीठ आणि इतर भाज्या घालून परता.
३. झाकण ठेवून भाज्या शिजवा. कुकरमध्ये शिजवलेले डाळ-भात डावाने मिक्स करा आणि थोडे थोडे करून भाज्यांमध्ये घालून परता.
४. १/२ कप पाणी घालून ढवळा. चव बघून मीठ आणि १ टीस्पून बिसिबेल्ले पेस्ट घाला. गरज वाटल्यास तिखटपणाला लाल तिखट घाला.
५. बिसिबेल्ले भाताला एक उकळी काढा. हा भात थोडा ओलसर असतो नेहमीच्या भातासारखा सुका नसतो त्यामुळे आवडीप्रमाणे कमी जास्त पाणी घाला.
६.वरून हिंग मोहरी कढीपत्याची फोडणी द्या. कोथिंबीर पेरून सर्व्हकरा.तोंडी लावायला लोणचं किंवा पापड द्या.
bisibile bhat paste mahanje kay
ReplyDelete