Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी
साहित्य:
२०० ग्रॅम पनीर
१ कप बारीक चिरलेला कांदा
१ टोमॅटो
१/४ टीस्पून हळद
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१/२ टीस्पून जिरे
१ टीस्पून बारीक चिरलेली लसूण
१ टीस्पून बारीक चिरलेलं आलं
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ टीस्पून चाट मसाला
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तेल
कृती:
१. पनीर हाताने कुस्करून बारीक चुरा करून घ्या.
२. पातेल्यात तेल गरम करा आणि तेलात जिरे फोडणीला घाला. जि-याचा खमंग वास आला कि कांदा, हिरवी मिरची, आलं,लसूण घालून २-३ मिनिटे परता. कांदा गुलाबीसर झाला कि हळद आणि टोमॅटो (बारीक चिरून) घालून तेल सुटेपर्यंत परता.
३. नंतर पनीर घालून १-२ मिनिटे परता.पनीर गरम झाल्यावर वितळते.त्यामुळे जास्ती वेळ परतू नका.पनीर एकजीव होऊन लगदा होऊ देऊ नका. काटा चमच्याने मध्ये मध्ये परता.शेवटी चाट मसाला आणि मीठ घालून परता आणि १ वाफ काढा. कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!