हाका नुडल्स - Hakka Noodles

Servings : 4 Personsसाहित्य:
१ पाकीट चायनीज हाका नुडल्स
१/४ कप उभा चिरलेला कोबी
१  कप उभा चिरलेला कांदा
१/२ कप उभी चिरलेली भोपळी मिरची
१/४ कप गाजराच्या मध्यम फोडी 
३ पातीचे कांदे
कांद्याची पात चिरून
२ सुक्या लाल मिरच्या
१/४ टीस्पून मिरपूड
२ टेबलस्पून सोया सॉस
१ टीस्पून विनेगर
३ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे 

कृती:
१. नुडल्स  बुडतील इतक्या पाण्यात घालून गॅस वर उकळत ठेवा. पाण्यात १ टीस्पून तेल आणि  १/४ टीस्पून मीठ घाला.
२. नुडल्स शिजल्या कि चाळणीत घालून ठेवा म्हणजे पाणी पूर्ण निघून जाईल. नुडल्स जास्ती वेळ  शिजवू नका.
३. कढईत तेल गरम करा आणि  सुक्या मिरच्या दोन तुकडे करून घाला. लगेचच कांदा घालून परता.
४. लगेचच गाजर, भोपळी मिरची आणि पातीचा कांदा मधोमध चिरून घाला. मीठ,सोया सॉस,विनेगर  आणि मिरपूड घालून परता.
५. भाज्या अर्धवट शिजेपर्यंत परता आणि लगेच उकडलेल्या नुडल्स घालून परता. नुडल्स परतताना एकावेळेला दोन डाव वापरा म्हणजे नुडल्स नीट मिक्स होतील.
झाकण ठेवून १ वाफ आणा आणि वरून कांद्याची पात घालून लगेच serve करा.

3 comments:

 1. Thanks........pretty helpful for my mom

  ReplyDelete
 2. Thanks..........Nice Procedure given by you
  Thanks Again

  ReplyDelete
 3. wow.... thank you so much for this easy recipe.

  ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!