साहित्य:
१ मध्यम कोबी
१/४ कप भिजवलेली चणा डाळ (चणा डाळ आधीच २ तास पाण्यात भिजवून ठेवा.)
१/२ टीस्पून हळद
२ हिरव्या मिरच्या
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
१ टेबलस्पून कोथिंबीर
२ टेबलस्पून ओलं खोबरं
मीठ चवीप्रमाणे
कृती:
१. कोबी बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम करा आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, हिरवी मिरची तुकडे करून घाला.हळद आणि हिंग घाला.
२. लगेच चण्याची डाळ आणि कोबी फोडणीला घाला. मीठ घालून परता.
३. ३-४ मिनिटे झाकण ठेवून कोबी वाफवून घ्या. कोबी एकदम मऊ होईल इतका शिजवू नका.
४. वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून भाजी सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!