आंबट वरण- Ambat Varan (Spicy and sour Dal)

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी
साहित्य:
१/४ कप तुरीची डाळ

१ हिरवी मिरची
१ टीस्पून चिंचेचा कोळ 
१/२ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१ टेबलस्पून कोथिंबीर
४-५ लसूण पाकळ्या

२ टेबलस्पून तेल
मीठ चवीप्रमाणे


कृती:
१. कुकर मध्ये हिरवी मिरची घालून डाळ मऊसर शिजवून घ्या. कुकर थंड झाला कि डाळ डावाने चांगली घोटून घ्या. मिरची काढून टाका.
२. डाळ घोटून त्यात धने-जिरे पूड,लाल तिखट,हळद,मीठ,चिंच आणि कोथिंबीर बारीक चिरून घाला.
३. पाणी घालून डाळ  २-३ मिनिटे उकळा.
४. फोडणीच्या कढईत तेल गरम करा आणि लसूण चिरून किंवा ठेचून घाला. लसूण गुलाबी झाली कि आमटीला लसणीची फोडणी द्या.

1 comment:

  1. Good Day,
    Thanks. I am alone in my house in Nasik. Wife cooks when I am in Mumbai. Got seak eating outside food. Your recipe is simple and easy to make. Thanks again

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!