मद्रास सांबार-Madras Sambar

Servings : 2 to 3 persons



साहित्य: 
१/२ कप तुरीची डाळ
४-५ टीस्पून मद्रास सांबार पावडर (मी MTR ची वापरते)
३ टीस्पून चिंचेचा घट्ट कोळ
१/२ टीस्पून गुळ
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
६-७ कढीपत्ता पाने
४ टेबलस्पून तेल
१ छोटा वांगं (एका वांग्याच्या ४-६ फोडी करा)
२ लाल मुळे / पांढ-या मुळ्याच्या ३-४ फोडी
२-३ कोवळी भेंडी २" लांबीचे तुकडे करून
१ छोटा टोमॅटो मोठ्या फोडी करून
कांद्याच्या ८-१० चौकोनी फोडी / ४-५ बेबी ओनिअन
मीठ चवीप्रमाणे

कृती:
१.आधी तुरीची डाळ कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करा. कांदा फोडणीला घाला. २-३ मिनिटे कांदा परता.
२. कांदा परतल्यावर हळद, १ टीस्पून सांबार पावडर, १ टीस्पून चिंच घाला. लगेचच मुळा, वांग्याच्या फोडी घाला. झाकण ठेवून मुळा शिजवा.
३. भेंडी घालून परता. मीठ घालून २-३ मिनिटे झाकण ठेवून शिजवा. कुकर थंड झाल्यावर डाळ घोटून घ्या. परतलेल्या भाज्यांमध्ये थोडी थोडी डाळ घालून ढवळा. टोमॅटो घाला.२ टीस्पून सांबार पावडर,चिंचेचा कोळ,१/२ टीस्पून गुळ, मीठ घाला. १ १/२ कप पाणी घालून उकळी काढा.
४. चव बघून मीठ ,मसाला घाला. सांबार ३-४ मिनिटे उकळत ठेवा.
५. फोडणीच्या कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा. तेल कडकडीत तापलं कि मोहरी, कढीपत्ता आणि हिंग घाला आणि सांबारला वरून फोडणी द्या. फोडणी दिल्यावर लगेच वरून झाकण ठेवा. म्हणजे सांबारला फोडणीचा स्वाद चांगला येईल.
६. गरम गरम सांबार इडली, उत्तपम, दोसे किंवा मेदू वड्या बरोबर serve करा.
बरोबर नारळाची चटणी द्या.








No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!