Servings : 3 to 4 Persons
साहित्य:
५ कप दुध
१/४ कप तांदूळ
२ टेबलस्पून बदामाचे कप
१/४ टीस्पून वेलची पूड
२-३ टेबलस्पून स्वीटंड कंडेन्स मिल्क
१ कप बारीक चिरलेली फ्रेश स्ट्रॉबेरी
३-४ थेंब स्टॉबेरी इसेन्स
साखर चवीप्रमाणे
कृती:
१. तांदूळ १ तास आधी धुवून ठेवा. नंतर मिक्सरवर सरभरीत वाटून घ्या. कुकरमध्ये अडीच पट पाणी घालून मऊसर भात करून घ्या.
२. पातेल्यात दुध गरम करा आणि बारीक आचेवर ठेऊन एकूण दुधाची १" पातळी कमी होईल इतके आटवून घ्या. दुध पातेल्याच्या तळाला लागू नये म्हणून सतत ढवळा. दुध ब-यापैकी आटले कि दुधाचा पांढरा रंग किंचित ब्राऊन होईल. दुधावर साय येऊ देऊ नका.
३. तयार भात डावाने घोटून एकजीव करून घ्या. आटवलेल्या दुधात भाताची पेस्ट मिस्क करा. स्वीटंड कंडेन्स मिल्क घालून ढवळा आणि ४-५ मिनिटे उकळत ठेवा.
४. एकीकडे मिश्रण सतत ढवळत रहा. वेलची पूड आणि बदाम घालून ५-६ मिनिटे उकळवा. नंतर गॅस बंद करून मिश्रण गार होईपर्यंत मध्ये मध्ये ढवळत रहा म्हणजे साय येणार नाही.
५. स्वीटंड कंडेन्स मिल्क आधीच खूप गोड असते त्यामुळे गरज वाटली तरच साखर घाला.स्ट्रॉबेरी इसेन्स घालून ढवळा.मिश्रण गार झालं कि त्यात बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी घालून ढवळा. मिश्रण गरम असताना स्ट्रॉबेरी घालू नका नाहीतर दुध आंबटपणामुळे दुध फाटण्याची शक्यता असते.
६. फ्रीज मध्ये ठेवा आणि वरून स्ट्रॉबेरीचे तुकडे घालून थंड serve करा.
टीप: स्वीटंड कंडेन्स मिल्क नसेल तर दुध आटवून एकूण प्रमाणाच्या निम्मे करावे आणि चवीप्रमाणे साखर घालावी.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!