सर्व्हिंग: ४ ते ५ पराठे
साहित्य:
१ कप गव्हाचं पीठ
पीठ मळण्यासाठी पाणी
१/४ कप निरसं दुध
१ टेबलस्पून तेल
तांदळाचं पीठ (लाटताना वरून लावण्यासाठी)
१/४ टीस्पून साखर
बटर
१ टीस्पून मीठ
कृती:
१. गव्हाच्या पिठात मीठ,साखर,१ टीस्पून तेल, निरसं दुध घालून कालवून घ्या. पाणी घालून पीठ मळुन घ्या. पीठ खूप घट्ट किंवा खूप सैलसर नसावे.
२. मळलेले पीठ १ ते २ तास झाकून ठेवा. म्हणजे ते चांगले मुरेल. पीठाचे समान ४-५ गोळे करा. आणि साधारण ७"-८" व्यासाची पोळी लाटून घ्या.
३. पोळीला चमच्याने किंचित तेल लावा आणि वरून तांदळाच पीठ भुरभुरवा.
४. खाली फोटोत दिल्याप्रमाणे त्याच्या एकदा वर एकदा खाली अश्या नागमोडी घड्या करा आणि गुंडाळी करा.
५. शेवटच टोक तेल तावून चिकटवून घ्या. आणि गुंडाळी तळव्याने अलगद दाबा. तांदळाचं पीठ लावून पुन्हा लाटून घ्या.
६. पराठा खूप पात्तळ लाटू नका. साधारण 3mm जाडी ठेवा. तवा गरम करून पराठा घाला. वरून किंचित बटर किंवा तेल लावा. पराठ्याला फोड आले कि उलटा. दोन्ही बाजूने पूर्ण भाजून घ्या.
७. गरम पराठा भाजी बरोबर सर्व्हकरा.
could you please provide how to make a BHAKARI(read in marathi) ??
ReplyDelete