सर्व्हिंग: ४ ते ५ पराठे
साहित्य:
२- ३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
१/२ कप गव्हाचं पीठ
पीठ मळण्यासाठी पाणी
१ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
१ हिरवी मिरची बारीक वाटून
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
तांदळाचं पीठ (लाटताना वरून लावण्यासाठी)
बटर
मीठ चवीप्रमाणे
कृती:
१. सारणासाठी उकडलेले बटाटे हाताने कुस्करून किंवा किसून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट,वाटलेली हिरवी मिरची,कोथिंबीर,मीठ घाला. सारण हाताने चांगले कालवून घ्या. बटाट्याच्या अख्या फोडी राहणार नाहीत याची काळजी घ्या. सारणाचे लाडवांना करतो साधारण तितक्या आकाराचे ४-५ समान गोळे करा.
२. गव्हाच्या पिठात १/२ टीस्पून मीठ घालून पीठ मळुन घ्या. पीठ खूप घट्ट किंवा खूप सैलसर नसावे. मळलेले पीठ १ ते २ तास झाकून ठेवा. म्हणजे ते चांगले मुरेल.
३. पीठाचे समान ४-५ गोळे करा. आणि साधारण ६"-७" व्यासाची पोळी लाटून घ्या. पोळीच्या मध्यभागी सारणाचा गोळा ठेवा आणि बाजूच्या पोळीने मोदकाला करतो तसे झाकून घ्या.(खाली फोटोत दिले आहे)
४. हलक्या हाताने दाबून गोळ्याला तांदळाचे पीठ लावा आणि पराठा हलक्या हाताने लाटून घ्या. खूप जोर देऊन लाटल्यास सारण कडेने बाहेर यायची शक्यता असते.गोळ्याला पूर्ण स्पर्श होईल अश्या पद्धतीने पोळी फोल्ड करा. म्हणजे पराठा लाटताना सारण कडेपर्यंत पोचेल.
६. पराठा खूप पात्तळ लाटू नका. साधारण 4mm जाडी ठेवा. तवा गरम करून पराठा घाला. तव्यावर घातलेली बाजू खरपूस भाजली गेली कि उलटा. बटर लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
७. गरम पराठ्या बरोबर दही किंवा लिंबाचे गोड लोणचे द्या.
very simple and nice recipe
ReplyDeletewow
ReplyDelete