सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
साहित्य :
३ टोमॅटो
३-४ लसूण पाकळ्या
१/२ टीस्पून मिरेपूड
१ टेबलस्पून लोणी
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
ब्रेड क्रम्स करण्यासाठी-
ब्रेडचा १ स्लाइस
३ टेबलस्पून तेल
चिमुट मीठ,१ चिमुट मिरेपूड,१/२ टीस्पून पार्सले
कृती :
१. प्रथम टोमॅटो उकडून त्याची प्युरी करून घ्या.
२. पातेल्यात बटर घालून गरम करा आणि त्याच्यात लसूण ठेचून घाला.
३. मिरेपूड घालून मग टोमॅटो-प्युरी घाला.
४. २ १/२ कप पाणी घाला मीठ साखर घालून ढवळा.
५. सूप ५-१० मिनिटे चांगले उकळू दे. ब्रेड क्रम्स घालून गरम सर्व्ह करा.
६. ब्रेडच्या स्लाइसचे कात्रीने चौकोनी छोटे तुकडे करा.
७. कढईत तेल गरम करा आणि ब्रेडचे तुकडे घालून परता. वरून १ चिमुट मीठ,१ चिमुट मिरेपूड,१/२ टीस्पून ड्राय पार्सले घाला.
८. मंद आचेवर तुकडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता. गरम सुपात सर्व्ह करायच्या वेळी वरून ब्रेड क्रम्स घाला.
टीप: ब्रेड क्रम्स जास्ती करून ठेवले तर एअर टाइट बरणीत भरून ठेवा म्हणजे मऊ पडणार नाहीत.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!