सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी
साहित्य:
१ कप बासमती तांदूळ
४-५ मध्यम बटन मशरूम, मध्यम जाडीचे काप करा.
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ काप बारीक चिरलेली कांद्याची पात
१" आलं, उभे चिरून जाड काड्या करा.
१ टेबलस्पून सोया सॉस
२ टीस्पून विनेगर
१/२ टीस्पून मिरपूड
१ चिमुट अजिनोमोटो
मीठ चवीप्रमाणे
३ टेबलस्पून तेल
कृती:
१. तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. पातेल्यात १ १/२ टेबलस्पून तेल गरम करा. तेल तापले कि त्यात तांदूळ घालून तांदूळ सुटसुटीत होई पर्यंत ३-४ मिनिटे परतून घ्या. तांदुळाच्या बरोबर दुप्पट (इथे २ कप) गरम पाणी घाला. मीठ घालून मध्यम आचेवर भात शिजवून घ्या. पाणी पूर्ण आतून भात शिजला कि, गॅस बंद करा आणि ५-१० मिनिटांनी वाफ मुरल्यावर झाकण काढून टाका. एका ताटात/परातीत भात घालून गार करण्यासाठी ठेवा म्हणजे भात छान मोकळा होईल.
२. पातेले स्वच्छ पुसून घ्या आणि त्यात १ १/२ टेबलस्पून तेल गरम करा. तेल तापले कि त्यात आल्याच्या काड्या घाला. लगेचच कांदा घालून ३-४ मिनिटे परता.
३. कांदा शिजला कि, मशरूमचे काप घालून परता. लगेचच सोया सॉस , अजिनोमोटो, मीठ, मिरपूड आणि विनेगर घालून परता. झाकण ठेवून २-३ मिनिटे मशरूम शिजवून घ्या. गॅस बंद करा.
४. मशरूम शिजले कि त्यातच डावाने थोडा थोडा करून सगळा भात मिक्स करा. वरून कांद्याची पात घाला. झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढा आणि सर्व्ह करा.
me ha nakkich hya ravivari karun baghnar
ReplyDeleteaani tumhala hi nakki kalven kasa zala te
yogita
Hi Yogita..
ReplyDeletethank you..Ho mala nakki kalav ksa zala hota te :)