उपमा -Upma

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठीसाहित्य:
१/२ कप जाडा रवा
सव्वा ते दीड कप गरम पाणी
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
पाव कप मटार
६-७  काजू
१ १/२ टीस्पून किसलेलं आलं
१ टेबलस्पून ओलं खोबरं
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी-
२ टेबलस्पून तूप/ तेल
१/४ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हिंग
२ सुक्या मिरच्या
१ टीस्पून उडदाची डाळ
४-५ कढीपत्ता पाने
मीठ चवीप्रमाणे
१ १/४ टीस्पून साखर

कृती:
१. कढई गरम करून रवा तेल किंवा तूप 'न घालता' गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. रवा भाजून झाला कि तो कढईतून  बाजूला काढून ठेवा. 
२. कढईत तूप गरम करा. तूप चांगले तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, जिरे आणि सुक्या मिरच्या २ तुकडे करून घाला. उडदाची डाळ घाला. डाळ गुलाबी झाली कि, कढीपत्ता आणि हिंग घाला. लगेच कांदा घालून परता. एकीकडे पाणी गरम करायला ठेवा.
३. ३-४ मिनिटे कांदा परतून त्यात किसलेले आले,काजू आणि मटार घाला.२-३ मिनिटे छान परतून घ्या. मग भाजलेला रवा घालून ३-४ मिनिटे परतत रहा. ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून परता.
४. मीठ आणि साखर घाला. मग आधणाचे गरम पाणी घाला. ढवळून वरती झाकण ठेवा. ५ मिनिटांनी रवा छान फुलून येईल आणि उपमा पूर्ण शिजेल.
५. गरम गरम उपमा, वरती बारीक शेव, ओलं खोबरं आणि कोथिंबीर  घालून सर्व्ह करा.

टीप:
रवा नीट भाजला गेला नाही तर उपमा गिच्च होतो त्यामुळे रवा छान गुलाबी रंग येई पर्यंत खमंग भाजून घ्या.
रवा पटकन करपण्याची शक्यता असते त्यामुळे रवा भाजताना त्याकडे सतत लक्ष द्यावे लागते आणि सतत परतत राहावे लागते.

2 comments:

  1. khup chhap blog banavala aahe

    ReplyDelete
  2. me hya reciepe pramane upma banavla pan bahutek rava thoda jast bhajla gela taste tar bari ahe pan rang khup brown ahe gulabi nahi

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!