सर्व्हिंग: ४ ते ५ मध्यम थालीपीठे
साहित्य:
१ कप भाजाणी ( रेसिपीसाठी इथे क्लिक करा.)
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून तीळ
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून लाल तिखट
३/४ टीस्पून मीठ
पीठ मळण्यासाठी पाणी
शालो फ्राय करण्यासाठी तेल
आणि
१ छोटा नॉनस्टीक तवा
कृती:
१. परातीत भाजाणी घ्या.त्यात हळद, तिखट, मीठ,तीळ,बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हाताने कालवून घ्या.
२. गार पाण्याने सगळे मिश्रण, पोळीच्या पिठासारखे भिजवून घ्या. पीठ थोडेसे सैलसर भिजवा म्हणजे थालीपीठ थापताना सोपे जाईल. पीठ जास्ती वेळ मळू नका म्हणजे थालीपीठ खुसखुशीत होईल.
३. पीठाचे समान २ १/२" ते ३" गोळे करून घ्या. तवा गार असतानाच त्यावर १ चमचा तेल घाला. थालीपीठाचा गोळा त्यावर ठेवा.
४. थालीपीठ चार बोटांनी हळू हळू दाब देत गोल थापून घ्या. पीठ हाताला चिकटत असेल तर हात ओला करून थापा.
५. थालीपीठ पात्तळ थापून घ्या आणि बोटाने ३-४ जागी भोकं करा. चमच्याने २-३ थेंब तेल सगळ्या भोकात सोडा. थालीपीठाला सगळ्या बाजूने गोल असे तेल सोडा.
६. गॅस चालू करून वरून घट्ट झाकण ठेवा. ५-७ मिनिटांनी चुरचुर आवाज यायला लागला कि झाकण काढून टाका. ५ मिनिटे तसेच भाजा. खालची बाजू छान भाजली गेली कि थालीपीठ उलटवून दुसरी बाजू चमचाभर तेल घालून खरपूस भाजून घ्या.
७. गरम थालीपीठ लिंबाचे गोड लोणचे, लोणी किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा.
टीप: जमत असेल तर थालीपीठ प्लास्टिक शीटवर थापून तव्यावर टाकले तरी चालेल. प्लास्टिक शीटला तेलाचा हात लावून मग त्यावर थालीपीठ थापा. या पद्धतीमुळे कमी वेळात जास्ती थालीपीठे थापून होतात. आणि तवा आधीच गरम असल्यामुळे काम पटापट होते
ek dum bhari solid yar
ReplyDeleteThanks Pankaj...
ReplyDelete