सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
साहित्य:
३०० ग्रॅम बोनलेस चिकन
१ टीस्पून बटर
मॅरीनेट करण्यासाठी-२ टेबलस्पून घट्ट दही
१ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
१ टीस्पून तेल
१ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट (बेडगी मिरची पावडर)
१/४ टीस्पून गरम मसाला
२ टीस्पून तंदूर मसाला
मीठ चवीप्रमाणे
मखनी ग्रेवी बनवण्यासाठी-३ मध्यम टोमॅटो
१/४ कप काजू
२ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
३ टेबलस्पून बटर
खडा गरम मसाला ( २ वेलची,१" दालचिनीचा तुकडा,३ लवंगा, ४-५ मिरी)
१ १/२ टीस्पून लाल तिखट (रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर)
१ टेबलस्पून मध/ साखर
१ टीस्पून कसुरी मेथी
१/४ कप क्रीम
मीठ चवीप्रमाणे
सजावटीसाठी पुदिन्याची किंवा कोथिंबीरिची पाने
३०० ग्रॅम बोनलेस चिकन
१ टीस्पून बटर
मॅरीनेट करण्यासाठी-२ टेबलस्पून घट्ट दही
१ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
१ टीस्पून तेल
१ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट (बेडगी मिरची पावडर)
१/४ टीस्पून गरम मसाला
२ टीस्पून तंदूर मसाला
मीठ चवीप्रमाणे
मखनी ग्रेवी बनवण्यासाठी-३ मध्यम टोमॅटो
१/४ कप काजू
२ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
३ टेबलस्पून बटर
खडा गरम मसाला ( २ वेलची,१" दालचिनीचा तुकडा,३ लवंगा, ४-५ मिरी)
१ १/२ टीस्पून लाल तिखट (रंग येण्यासाठी बेडगी मिरची पावडर)
१ टेबलस्पून मध/ साखर
१ टीस्पून कसुरी मेथी
१/४ कप क्रीम
मीठ चवीप्रमाणे
सजावटीसाठी पुदिन्याची किंवा कोथिंबीरिची पाने
१. चिकनचे १" लांब तुकडे करा.चिकनला दही,लाल तिखट,हळद,मीठ,तंदूर मसाला,गरम मसाला आणि तेल याचे मिश्रण लावून २ ते ३ तास मरीनेट करून फ्रीज मध्ये ठेवा.
२. बेकिंग ट्रेला बटरचा हात लावून घ्या. ओव्हन 375°F तापमानाला प्रीहीट करून चिकनचे तुकडे १५ मिनिटे शिजवा. नंतर तुकडे उलटवा आणि वरून बटर सोडून आणखीन ५ मिनिटे शिजवा.
३. टोमॅटो उकडून घ्या आणि त्याची प्युरी करा. काजूची बारीक पेस्ट करून घ्या.कढईत बटर गरम करा. खडा गरम मसाला घाला. मिनिटभर परतून आलं-लसूण पेस्ट घालून परता. लाल तिखट, टोमॅटोची प्युरी आणि काजूची पेस्ट घालून उकळी काढा. गॅस बारीक करून १० मिनिटे झाकण ठेवून शिजवा. नंतर त्यात मध आणि कसुरी मेथी घालून ५ मिनिटे उकळत ठेवा.
४. ग्रेवीत तंदूर केलेले चिकनचे तुकडे घाला. झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर शिजवा. गॅस बंद करून ५ मिनिटांनी क्रीम घाला.
५. वरून कोथिंबीर घालून नान किंवा रोटी बरोबर सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!