दही बुत्ती -Curd rice

Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य:
३/४ कप तांदूळ
१ १/२ कप पाणी,भात शिजवण्यासाठी
३/४ कप घट्ट दही
१/४ कप दुध
१ १/२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
फोडणीसाठी-
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून जिरे
२ तळणीच्या भरलेल्या मिरच्या किंवा १-२ सुक्या मिरच्या आणि हिंग 
२-३ कढीपत्ता पाने 
१ टेबलस्पून तेल 
सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
तळणीची  भरलेली मिरची  

















कृती:
१. दुप्पट पाणी घालून कुकरमध्ये नेहमीसारखा भात शिजवून घ्या.
२. भात थंड झाला कि त्यात दही आणि दुध घालून एकत्र करून घ्या.
३. मीठ आणि साखर घालून एकत्र करा.
४. फोडणीच्या कढईत  तेल कडकडीत गरम करा. तळणीची  मिरची तळून घ्या. त्यातच मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, जिरे आणि कढीपत्ता पाने घाला आणि भाताला फोडणी द्या. फोडणी दिल्यावर काहीवेळ भात झाकून ठेवा.,
५. सर्व्ह करायच्या आधी भातात चमच्याने तळणीची मिरची कुस्करा आणि छान मिक्स करून कोथिंबीर पेरून सर्व्ह करा. तोंडी लावायला बरोबर एखादे लोणचे किंवा भाजी द्या.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!