सर्व्हिंग: २ माणसांसाठी
१/२ कप साबुदाणा
१/४ कप साखर
२ कप दुध
१ टेबलस्पून काजूचे तुकडे
१ टेबलस्पून बेदाणे
चिमुटभर केशर
१/४ टीस्पून वेलची पूड
१ टीस्पून तूप
कृती:
१. साबुदाणा २-३ वेळा स्वच्छ धुवून भिजवून ठेवा. जितका साबुदाणा तितकेच पाणी येईल अशा पद्धतीनी भिजवा. ४-५ तासांनी साबुदाणा फुगून येईल.
२. १ कप दुध उकळत ठेवा. दुध उकळले कि त्यात साबुदाणा घाला. साबुदाणा अर्धवट शिजला असे वाटले कि, उरलेले दुध घाला. आणि साबुदाणा पूर्ण शिजेपर्यंत उकळत ठेवा. साबुदाणा तरंगायला लागला याचा अर्थ शिजला आहे.
३. मग त्यात साखर,वेलची पूड आणि केशर घाला. मंद आचेवर १५-२० मिनिटे शिजवत ठेवा.
४. दुसरीकडे एका छोट्या पातेलीत तूप गरम करा. त्यात काजू आणि बेदाणे गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्या आणि मग उरलेल्या तुपासकट खिरीत घालून ढवळून मग सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!