तिखट मिठाचा सांजा-Tikhat Mithacha Sanja

सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य:
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१ टेबलस्पून मटार
१/२ कप रवा
१ १/४ ते १ १/२ कप पाणी
फोडणीसाठी
२-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
५-६ कढीपत्ता पाने  
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
१/४  टीस्पून हळद 
आणि
१ टेबलस्पून तेल
१ टेबलस्पून खवलेलं खोबरं
सजावटीसाठी १/२ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर

कृती:
१. कढई गरम करून रवा तेल  'न घालता' गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. रवा भाजून झाला कि तो कढईतून  बाजूला काढून ठेवा. 
२. कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला. कढीपत्ता आणि हिंग घाला.हळद घाला. लगेच कांदा घालून परता. एकीकडे पाणी गरम करायला ठेवा.
३. ३-४ मिनिटे कांदा परतून त्यात मटार घाला.२-३ मिनिटे छान परतून घ्या. मग भाजलेला रवा घालून ३-४ मिनिटे परतत रहा. ओलं खोबरं घालून परता.
४. मीठ आणि साखर घाला. मग आधणाचे गरम पाणी घाला. ढवळून वरती झाकण ठेवा. ५ मिनिटांनी रवा छान फुलून येईल आणि सांजा पूर्ण शिजेल.
५. गरम गरम सांजा, वरती ओलं खोबरं आणि कोथिंबीर  घालून सर्व्ह करा.

टीप:
रवा नीट भाजला गेला नाही तर सांजा गिच्च होतो त्यामुळे रवा छान गुलाबी रंग येई पर्यंत खमंग भाजून घ्या.
रवा पटकन करपण्याची शक्यता असते त्यामुळे रवा भाजताना त्याकडे सतत लक्ष द्यावे लागते आणि सतत परतत राहावे लागते.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!