व्हेज प्लॅटर- Assorted Veg. Platter

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य :
पनीर २५ ग्रॅम  ( चौकोनी तुकडे करून)
भोपळी मिरचीचे ४-५ चौकोनी तुकडे
फ्लॉवर ३-४ तुरे
बटाटा ३-४ तुकडे
कांद्याचे ३-४ चौकोनी चिरून तुकडे
३-४ अख्खे बटन मशरूम
मसाला-
१ टीस्पून धनेपूड
१ टीस्पून जिरेपूड
१ १/४  टीस्पून तंदूर मसाला
१/२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून बेसन
१ टीस्पून दही
१/२ टीस्पून लिंबुरस
मीठ चवीप्रमाणे
चिमुटभर साखर

कृती :
१.सगळ्या भाज्यांना वरील मसाला लावून १ तास मॅरीनेट करून ठेवा.
२.ओव्हन  400ºF तापमानाला preheat  करा. एका बेकिंग ट्रेला बटरचा हात लावून घ्या.ट्रे मध्ये थोड्या थोड्या अंतरावर प्रत्येक तुकडा ठेवा.
३.साधारण  १०-१५ मिनिटांनी प्रत्येक तुकडा उलटा करा. लागल्यास त्यावरून बटर फिरवा.
४.आणखीन १५ मिनिटांनी बाहेर काढा आणि हिरव्या मिंट चटणी बरोबर सर्व्ह करा.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!