A North Indian specialty of roasted Brinjal cooked with spices and made into a simple yet tasty preparation.
Servings :4 Persons
साहित्य :
१ मोठं भरताचं वांगं
१ मध्यम कांदा बारीक चिरून
१ टोमॅटो बारीक चिरून
६-७ लसूण पाकळ्या
१/२ टीस्पून जिरे
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
मीठ चवी प्रमाणे.
चिमुटभर साखर
३ टेबलस्पून तेल
कृती :
१. भरताचं वांगं preheated oven मध्ये किंवा गॅस वर त्याला सुरकुत्या पडे पर्यंत (अंदाजे ३० मिनिटे) भाजून घ्या. ५-५ मिनिटांनी गोल फिरवत रहा म्हणजे सगळ्या बाजूने भाजलं जाईल आणि त्याची साल निघून येईल.गॅस वर भाजले तर सालीचे तुकडे थोडे थोडे निघून येतात. काटा चमच्याने टोचून बघा कि वांगं पूर्ण भाजलं गेलय का.
२. वांगं थंड झालं कि साल काढून हाताने कुस्करून ( mash करा ) ठेवा.
३. कढईत तेल गरम करा. त्यात जिरे फोडणीला घाला. मग बारीक चिरलेली लसूण घाला. लसूण गुलाबी झाली कि कांदा घालून गुलाबी होई पर्यंत परता.
४. मग हळद तिखट घाला. टोमॅटो घालून तेल सुटे पर्यंत परता.
५. कुस्करलेलं वांगं घालून परता. कोथिंबीर घालून नीट मिक्स करा. २ वाफा आणा आणि भाकरी किंवा भाताबरोबर serve करा.
टीप : अमेरिकेत इलेक्ट्रिक बर्नर असतो त्यामुळे oven मध्ये भाजावं लागतं पण गॅस वर वांगं भाजलं तर भरताला मस्त smokey flavour येतो.
.
Bhajtana thod oil lavun bhajale ki changle bhajale jate sal lavkar nigte
ReplyDeletevery very nice
ReplyDelete