Servings : 4 Persons
साहित्य :
१०-१५ बटण मशरूम
१ मध्यम कांदा
१ टोमॅटो
१ टीस्पून आले-लसूण पेस्ट
१ /२ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
२ टेबलस्पून दही
५ -६ काजू
१ टीस्पून खसखस
१ टीस्पून बेसन
१/४ कप कोथिंबीर
मीठ चवीप्रमाणे
चिमुटभर गरम मसाला
२ टेबलस्पून तेल
कृती :
१. गरम पाण्यात खसखस आणि काजू १०-१५ मिनिटे भिजवून ठेवा.
२. तेलात कांदा बारीक चिरून फोडणीला टाका. कांदा गुलाबी झाला कि त्यात आलं -लसूण पेस्ट घालून परता.
खमंग वास आला कि धणे-जिरेपूड लाल तिखट ,हळद घालून परता. मग टोमॅटो बारीक चिरून घाला आणि तेल सुटेपर्यंत परता.
३. मशरूमच्या चकत्या करा आणि त्या परता. झाकण ठेवून मशरूम शिजू द्या.
४.काजू आणि खसखस मधले पाणी काढून त्याची पेस्ट करून घ्या. हि पेस्ट २ टेबलस्पून दह्यात १ टीस्पून बेसन घालून घोटून ठेवा.
५. मशरूम पूर्ण शिजले कि त्यात हे मिश्रण घाला. गरम मसाला आणि १/२ कप पाणीघाला. मीठ घालून १ उकळी काढा.
६. वरून कोथिंबीर पेरून serve करा.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!