कुळथाचे कढण -Horsegram Soup

Healthy and  Tasty  Maharashtrian  Soup
Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी 
साहित्य :
१ कप कुळीथ
५  कप पाणी
१/२ कप गोड दह्याचे ताक
१ चमचा साखर
चिमुटभर लाल तिखट
मीठ चवीप्रमाणे
१/४ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हिंग
५-६ कढीपत्ता पाने
२ हिरव्या मिरच्या
१/४ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी १ टेबलस्पून तेल

कृती :
१. कुळीथ ८-१० तास भिजवून ठेवा. भिजवलेले कुळीथ चाळणीत झाकून उबदार जागी ठेवा. म्हणजे त्याला  मोड येतील.
२. मोड आलेले कुळीथ कुकरमध्ये ५-६ कप पाणी घालून ४-५ शिट्ट्या काढून मऊसर शिजवून घ्या.
३. कढणासाठी  वरचे पाणी ओतून घ्या. कुळीथ नंतर उसळीसाठी ठेऊन द्या.
४. कुळथाच्या पाण्यात मीठ, साखर, चिमुटभर लाल तिखट, कोथिंबीर घालून उकळा. उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि मग २-३ मिनिटांनी ताक घाला.
५. फोडणीच्या कढईत  तेल गरम करून आधी जिरे मग हिरव्या  मिरचीचे तुकडे घाला. मिरची पांढरी झाली कि मग कढीपत्ता आणि हिंग घालून कढणाला  वरून फोडणी द्या.

टीप : कुळथाचे कढण अतिशय पौष्टिक असते. आजारी माणसाला तोंडाला चव येण्यासाठी किंवा लहान मुलांना थंडी पावसाळ्यात द्यावे.
कुळथाच्या ऐवजी चवळी किंवा  मुग याचे सुद्धा अश्याच पद्धतीने कढण करता येते.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!