मालवणी चिकन-Malvani Chicken

Read this recipe in English 
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी


साहित्य :
६०० ग्रॅम चिकन
मॅरीनेट करण्यासाठी मसाला-
१/२" आलं + १०-१२ लसून पाकळ्या+ १/२ कप कोथिंबीर + १/२ टीस्पून हळद + १/४ टीस्पून गरम मसाला
रश्याच्या वाटणासाठी मसाला -
१ मध्यम कांदा उभा चिरून + १/२ कप सुकं खोबरं + २ टीस्पून धने + १/४ टीस्पून शहाजिरे + ८-१० मिरी + ४ लवंग + १ वेलची + २" दालचिनी
१ मध्यम कांदा बारीक चिरून
१/२ कप टोमॅटो प्युरी
२ टीस्पून लाल तिखट
मीठ चवीप्रमाणे
वरून पेरण्यासाठी कोथिंबीर

कृती :
१. आले-लसूण-कोथिंबीर मिक्सर वर बारीक वाटून घ्या. चिकनला हि पेस्ट ,हळद, गरम मसाला आणि मीठ लावून फ्रीज मध्ये ४-५ तास मॅरीनेट करून ठेवा.
२. पातेल्यात १ टेबलस्पून तेलात उभा चिरलेला कांदा, धने, शहाजिरे, मिरी,लवंग,दालचिनी आणि वेलची परता. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर सुकं खोबरं घालून ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या.
३. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरवर थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्या.
४. पातेल्यात तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर परता. २ टीस्पून लाल तिखट घाला. मॅरीनेट  केलेले चिकन घालून परता.
५. त्यात १ कप पाणी घाला. १०-१५ मिनिटे चिकन चांगले शिजू द्या. चिकन शिजले कि नंतर टोमॅटो प्युरी घाला. वाटण घालून सगळं नीट मिक्स करा.
६. गरज असेल तर आणखीन मीठ घालून १ उकळी काढा. वरून कोथिंबीर पेरून सर्व्ह करा.


टीप : हे चिकन तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा मालवणी कोंबडी वड्याबरोबर छान लागते. सर्व्ह करायच्या आधी ७-८ तास करून ठेवले तर चिकन जास्त छान मुरते आणि जास्ती चविष्ट लागते.

10 comments:

 1. Kaalach hi dish try keli...masta zaali hoti...we dont cook non veg at home so not used to it...pan mazi bayko solid khush zaali khaun....

  keep cooking and sharing with us...
  thanks again

  shailesh

  ReplyDelete
 2. Thanks Shailesh :)
  Keep visiting 'Ruchkar Jevan'

  ReplyDelete
  Replies
  1. Hi Kalyani,mi Reshma Potdar.Tumachya sagalyach dishes chagalya ahet.
   Pan mazi ek request ahe,amhi Black-Town la rahato amhala KADAVE VAL kuthe milatat te sangal ka?

   Delete
  2. mala KADAVE VAL kuthe milatat Sydney la te kalava.

   Delete
 3. mast...khup chan zale hote malvani chiken :)

  ReplyDelete
 4. नमस्कार विजयजी कमेंटसाठी खूप धन्यवाद!!

  ReplyDelete
 5. khup chan zale pan vdyache pit kase banvayche

  thank you

  ReplyDelete
 6. hi.. thanks a lot for the recipe, i m from chennai, south india hope when i prepare it will be tasty.. but i did not get what is this "wada"? n how to prepare it.. it will be helpful if u publish about wada along with this..
  sharada

  ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!