Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
साहित्य :
२ कप गाजराचा कीस
१ टीस्पून लिंबू रस
१ १/४ टीस्पून साखर
२ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
मीठ चवीप्रमाणे
फोडणीसाठी - १ टेबलस्पून तेल, १/४ टीस्पून मोहरी , १/४ टीस्पून हिंग ,५-६ कढीपत्ता पाने, १ हिरवी मिरची
कृती :
१. गाजराच्या किसाला मीठ ,साखर लावून घ्या. लिंबाचा रस घालून मिक्स करा.
२. फोडणीच्या कढईत तेल तापवून आधी मोहरी घाला. मोहरी तडतडली कि हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता घाला. शेवटी हिंग घालून कोशिंबीरीला फोडणी द्या.
टीप : फोडणी दिल्यावर लगेच कोशिंबीर झाकून ठेवा म्हणजे कोशिंबीरीला फोडणीचा छान स्वाद येतो.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!