Read this recipe in English
सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी
साहित्य :
फ्लॉवरचे १" लांबीचे १२ ते १५ तुरे
१ मध्यम आकाराचा बटाटा ( चौकोनी तुकडे करून ठेवा. )
१ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून
१ टेबलस्पून किसलेले आले
७-८ कढीपत्ता पाने
४ टेबलस्पून ओलं खोबरं
१/४ टीस्पून मिरेपूड
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून गोडा / काळा मसाला
१ टीस्पून किसलेला गूळ
२ १/२ कप पाणी
४ टेबलस्पून तेल फोडणीसाठी
मीठ चवी प्रमाणे
सजावटी साठी थोडी कोथिंबीर
कृती :
१. कढईत तेल तापवून त्यात किसलेले आले आणि कढीपत्ता घाला.
२. टोमॅटो घाला हळद ,तिखट, काळा मसाला, गूळ घालून परता. तेल सुटलं कि बटाटा आणि फ्लॉवरचे तुरे घालून ते परता.
३. मिरेपूड आणि ओलं खोबरं यांची पेस्ट करून घाला. मीठ घाला. सगळं एकत्र मिक्स करून २-3 वाफा आणा.
४. नंतर पाणी घालून बटाटा आणि फ्लॉवर शिजू द्या.
५. खोबरे घातल्याने रस्याला thikness येतो. पाणी जास्त वाटल्यास thikness वाढवण्यासाठी चमचाभर गव्हाचे पीठ लावले तरी चालते. त्याने चवीत फरक पडणार नाही.
६. वरून कोथिंबीर घालून सजवा आणि गरम पोळी बरोबर सर्व्ह करा.
टीप : आमटीच्या ऐवजी भाताबरोबर सुधा हा रस्सा छान लागतो.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!