मसालेभात- Traditional Maharashtrian Pulav

Its a traditional Maharashtrian Pulav cooked with spices and specific vegetables.
Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी


साहित्य :
वाटणासाठी - १ टीस्पून धने, १/२ टीस्पून जिरे ५-६ टेबलस्पून सुकं खोबर
१ १/२ कप बासमती तांदूळ
१/२ टीस्पून मोहरी
५-६ कढीपत्ता पाने
१/४ टीस्पून हिंग
२ टीस्पून काळा / गोडा मसाला
१/२ टीस्पून लाल तिखट
१-२ टेबलस्पून दही
८- १० काजू
१/४ कप मटार
फ्लॉवर चे ५-६ छोटे तुकडे

कृती :
१. प्रथम धने, जिरे ,खोबरे किंचित तेलावर भाजून घ्या.छान ब्राऊन रंग आला कि मिश्रण गार होऊ दे. नंतर मिक्सरवर बारीक वाटा.
२. पातेल्यात तेल तापवून मोहरी घाला. मोहरी तडतडली कि कढीपत्ता, हिंग घालून भिजवलेले तांदूळ घालून छान परता.
३. नंतर वाटण घाला. काळा मसाला, हळद , तिखट घालून परता.
४. भाज्या, काजू  घालून नीट मिक्स करा नंतर दही घालून परता. मीठ घाला.
५. सर्वात शेवटी तांदुळाच्या दुप्पट पाणी घालून ढवळा आणि वरून घट्ट झाकण ठेऊन गॅस बारीक करून ठेवा म्हणजे भात तळाला लागणार नाही.
६. भात शिजला कि वरून ओले खोबरे आणि कोथिंबीर, तूप घालून गरम गरम सर्व्ह करा.

टीप : तांदूळ जितके जास्त परताल तितका भात मोकळा होतो.
मसालेभातात मटार अणि फ्लॉवरच्या ऐवजी तोंडली आणि वांगी वापरली तरी चालतात.

2 comments:

  1. hi
    ur this recipe is very good .mi aajach karun pahili.sarvana khupch aavdli.sarvani khup koituk
    kela.kharcha khupch chan jhala hota masalebhat...........

    regards
    arya

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!