अंड्याच्या फुलांची भाजी- Egg flower Preparation

Very attractive and Tasty Egg preparation on Coconut and Onion base
Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी 


साहित्य :
६ अंडी
३/४   कप ओलं खोबरं
१/२ कप बारीक़ चिरलेली कोथिंबीर
३-४ हिरव्या मिरच्या
१ १/४  टीस्पून आले-लसूण पेस्ट
१/४ टीस्पून हळद
१ १/२ कप बारीक़ चिरलेला कांदा
४-५ टेबलस्पून तेल
 मीठ चवी प्रमाणे
पसरट भांडे/  deep pan




कृती :
१. प्रथम ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट मिक्सरवर बारीक़ वाटुन घ्या.
२. पसरट  भांड्यात किंवा खोलगट पॅन मध्ये तेल घालून कांदा फोडणीला टाका आणि २-३ मिनिटे परता.
३. वाटण घाला. वाटणा पुरताच मीठ घाला. हळद घालून कांदा छान परता.
४. मिश्रणाचा सपाट थर बनवा. आणि वरून एक एक अंडी फोडून घाला. प्रत्येक अंड्यामध्ये थोडा अंतर राहिला पाहिजे. overlap होऊ देऊ नका. वरून थोडेसे  मीठ आणि हळद शिंपडा.  त्यावर झाकण ठेऊन अंडी शिजू द्या.
५. अंडी पूर्ण शिजल्यावर वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
हि भाजी झाल्यावर अतिशय चवदार लागते आणि आकर्षक पांढ-या पिवळ्या फुलांसारखी दिसते.

4 comments:

  1. Namaskar, mala tumchya pakkruti avdatat pan photo disat nahit

    ReplyDelete
  2. Namaskar Deepali,
    Aga ha problem adhi ekda mala pan ala hota..ha google sites cha temporary problem ahe. To lavkarach fix hoil. Google chrome vaparat ashil tar tatpurti 'Mozilla firefox' kinva dusrya kuthlyahi browser madhun visit kar. Photos distil.
    Kalavlyabaddal thanks :)

    ReplyDelete
  3. hi recipe me aadhi pan try keli hoti...but ek problem as hoyacha ki Kanda jalun jayacha.... Egg shije paryant OR Egg kadhi kadhi shijayache nahi

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!