दडपे पोहे-Dadpe Pohe

It is a tasty and easy to prepare Maharashtrian dish prepared with thin poha and shredded coconut
Read this recipe in English
Servings : 4 Persons


साहित्य :
६ मुठी पात्तळ पोहे
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप ओलं खोबरं
३ टीस्पून लिंबू रस
२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
२ चिमुट शेंदेलोण-पादेलोण/ चाट मसाला
१/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
फोडणीसाठी- १/२ टीस्पून मोहरी, १/४ टीस्पून हिंग, ५-६ कढीपत्ता पाने २ हिरव्या मिरच्या.

कृती :

१. एका ताटात पात्तळ पोहे घ्या.त्यात कांदा,ओलं खोबरं,मीठ,साखर,शेंदेलोण-पादेलोण,कोथिंबीर घालून छान कालवून घ्या. लिंबू पिळा.
२.खोबरं, मीठ आणि लिंबाच्या ओलसर पणामुळे पोहे ओलसर होतील.
३.वरून हिंग मोहरी,कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी द्या. पोहे नीट मिक्स करून दडपून (वरून पातेलं उलटं ठेवून झाकून ) ठेवा.
४. ५-७ मिनिटांनी serve करा.

टीप: पोह्यांवर बारीक शेव घालून serve केले कि आणखीन छान लागतात.
फोडणी दिल्यावर लगेच झाकले तर फोडणीचा खमंगपणा जास्ती टिकतो.

1 comment:

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!