पंजाबी कढी-पकोडे - Kadhi Pakoda Panjabi style


Tasty Punjabi dish cooked with buttermilk kadhi and spicy methi Pakodas
Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी

साहित्य :
कढीसाठी -

१ १/२ कप दही
१ १/४ कप पाणी
२ टेबलस्पून बेसन
१ /२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून मेथी दाणे
१ लाल सुकी मिरची
१/४ कप कोथिंबीर बारीक चिरून
२ टेबलस्पून तेल
पकोड्यांसाठी-
१ १/२ कप मेथी
१ १/२ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ टीस्पून ओवा
१/२ टीस्पून जिरे 
१ टेबलस्पून किसलेले आले
मीठ चवीप्रमाणे
१/४ टीस्पून साखर
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
१ १/२ टीस्पून तांदळाचं पीठ
वरील मिश्रणात मावेल इतकं बेसन (अंदाजे ४-५ टीस्पून)
गरज वाटल्यास १-२ चमचे पाणी तळण्यासाठी तेल 

कृती :
१: पकोड्यासाठीचं साहित्य एकत्र करून कालवून घ्या. मीठ घातल्याने त्याला पाणी सुटेल. त्यात मावेल इतकंच बेसन घाला.मिश्रणाला चिकटपणा येईल.गजर वाटल्यास किंचित पाणी घाला म्हणजे पकोडे काढता येतील.
२. कढीसाठी एका भांड्यात. दही घोटून घ्या. त्यात बेसन, हळद, तिखट, मीठ साखर घालून घोटून घ्या. नंतर पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा.
३. पातेल्यात तेल गरम करा. आणि त्यात मेथीचे दाणे आणि सुकी मिरची घालून फोडणी करा. लगेचच तयार मिश्रण ओता.
४. कढीसाठीचे मिश्रण जाडसर होई पर्यंत ढवळत राहा. नंतर कोथिंबीर घालून मिक्स करा.
५. कढईत तेल गरम करून साधारण १ टेबलस्पून मापाचे पकोडे तळून घ्या.
६. तयार पकोडे कढीत घालून १ उकळी काढा. आणि गरम पराठा किंवा जीरा-राइस सोबत सर्व्ह करा.

टीप: सर्व्ह करायच्या वेळेस पकोडे कढीत सोडावेत मग उकळी काढून सर्व्ह करावेत. पकोडे आधीच कढीत सोडले तर त्याची मजा कमी होते.

3 comments:

  1. पकोड्यांसाठी-१ १/२ कप मेथी tumhi sangitali aahe ti konti methi? palebhaji chi mothi ki choti methi?

    ReplyDelete
  2. Hi Vrushali,
    Palebhajichi mothi ki choti methi mhanje nemka kay he mala kalale nahi..
    bhajisathi apan nehmi methichi (palebhaji)pane gheto tich ghyavit.

    ReplyDelete
  3. With the holiday season right around the corner, I'm going to be visiting ruchkarjevan even more frequently.
    It would be greatly helpful if you also posted how long the dishes can be refrigerated or frozen, or if some dishes are not meant to be frozen at all.

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!