दाण्याची आमटी-Danyachi Amti

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी 


साहित्य :
१ १/२ कप दाण्याचा कुट
३ कप पाणी
मीठ चवीप्रमाणे
२ टीस्पून साखर
२-३ आमसुलं  
१/२ टीस्पून जिरे
२ हिरव्या मिरच्या
२ टेबलस्पून कोथिंबीर
३ टेबलस्पून ओलं खोबरं
२ टेबलस्पून तूप

कृती :
१. दाण्याचा कुट पाण्यात मिक्स करा. त्यात मीठ, साखर, आमसुलं,  ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून उकळी काढा.
२.फोडणीच्या कढईत तूप गरम करा. तूप कडकडीत तापले कि मिरची (तुकडे करून) घाला.मिरची पांढरी झाली कि जिरे घालून आमटीला फोडणी द्या.
३. दाण्याची आमटी व-याच्या  तांदुळा बरोबर सर्व्ह करा.

टीप: दाण्याच्या कुटामुळे  आमटीला नंतर जाडसर पण येतो. त्यामुळे नंतर वाटलं तरच पाणी वाढवा.

1 comment:

  1. hi,
    Danyachi amati madhe dane bhajun ghalayache ahet ka, fodani varun ghalayachi ka, amatimadhe batata takala tar kase hoil.

    ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!