गुजराथी कढी-Gujrathi Kadhi

सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य :
१ १/२  कप दही
१/२ कप पाणी
१ टीस्पून बेसन
१/२ टीस्पून जिरे
२ हिरव्या  मिरच्या 
३-४ लवंग
१" दालचिनी
५-६ काळी मिरी
२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
१ टेबलस्पून तूप

कृती :
१. एका पातेल्यात दही घोटून  घ्या. त्यात बेसन, मीठ साखर  आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करा. हि कढी थोडी गोडसर असते.
२. पातेले गॅस वर ठेवा. ताक फुटू नये म्हणून सतत ढवळा. मिश्रण थोडे पात्तळ होईल. उकळी येणार असे वाटले कि लगेच गॅस बंद करा.
३. फोडणीच्या कढईत तूप गरम करा. आधी हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. मिरची पांढरी झाली कि लवंग, मिरी, दालचिनी आणि जिरे घाला. आणि कढीला वरून फोडणी द्या.
४. हि कढी आणि खिचडी किंवा गरम फुलक्यांबरोबर सर्व्ह करा.

2 comments:

 1. tasty & delish recipes in your blog. plz add more recipes. love visiting your blog.

  ReplyDelete
 2. Hi,

  Great to read Indian Heritage Home made food.
  it is a challange not only to foreign indin women but for indian women (including my wife) to think, plan, prepare, serve and satisfy husbad and kids on daily basis with different varities right from Breakfast to Dinner.

  Keep exploring new food caves. What about Misal and Vada Paw? How to make Tarri and Rassa?

  my best wishes and why you are hiding your name?

  Makarand Lele
  Practicing Company Secretary and Food lover
  Pune

  ReplyDelete

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!