मुगाच्या डाळीची खिचडी- Khichdi

सर्व्हिंग: ४ माणसांसाठी 

साहित्य : 
१ कप तांदूळ
३/४ कप मुगाची डाळ
१ टीस्पून गोडा मसाला
१/४ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हिंग
५-६ कढीपत्ता पाने
२ सुक्या लाल मिरच्या
१ १/२ टेबलस्पून गुळ
मीठ चवीप्रमाणे
3 टेबलस्पून तेल

कृती :
१. डाळ आणि तांदूळ एकत्र करून धुवून घ्या. कुकरमध्ये तेल गरम करा. जिरे फोडणीला घाला. मग मिरच्या (२ तुकडे करून), कढीपत्ता आणि शेवटी हिंग घाला. धुतलेले डाळ तांदूळ घाला आणि परता. नंतर गोडा मसाला, हळद लाल तिखट आणि गुळ घालून २-३ मिनिटे परता.
२. डाळ-तांदुळाच्या तिप्पट गरम पाणी घाला. मीठ घालून ढवळा. हि खिचडी मऊसर चांगली लागते.
३. कुकरच्या ३ शिट्या करा आणि नंतर वरती तूप घालून गुजराथी कढी आणि पापडा बरोबर सर्व्ह करा.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!