साहित्य :
४ मुठी जाडे पोहे
१ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप मटार
२ हिरव्या मिरच्या
१/४ टीस्पून हळद
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
३-४ कढीपत्ता पाने (optional )
१ टेबलस्पून ओलं खोबरं
१ १/४ टीस्पून साखर
१ टेबलस्पून कोथिंबीर
२ टीस्पून लिंबूरस
मीठ चवीप्रमाणे
कृती :
१. जाडे पोहे साध्या पाण्याने २ वेळा धुवून घ्या. पाणी पूर्ण काढून टाका. ५ मिनिटां नंतर पोहे चांगले भिजलेले दिसतील.
२. पोह्यांना हळद, मीठ साखर लावून घ्या.
३. कढईत तेल गरम करा आणि मोहरी घाला.मोहरी तडतडली कि हिरवी मिरची, कढीपत्ता पाने आणि शेवटी हिंग घाला. कांदा फोडणीला घाला.
४. कांदा २-३ मिनिटे परतून मटार घाला. झाकण ठेवून मटार शिजवा. नंतर भिजवलेले पोहे घालून परता.
५. झाकण ठेवून २ वाफा आणा. चव बघून आवश्यक असल्यास मीठ-साखर घाला आणि लिंबू रस घालून मिक्स करा.
६.नंतर वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून गरम गरम serve करा.
टीप: काही वेळेला पोहे धुवूनही नीट भिजत नाहीत अश्यावेळेस वरून पाण्याचे १-२ हबके मारा. खूप पाणी मारू नका नाहीतर पोहे मोकळे होणार नाहीत.
Ekdum mast . me pahilyanda kele anii zhakas zhale . thanks
ReplyDeleteI la....mastach ki....zakkaas
ReplyDelete