तिस-यांच दबदबीत -Mussels Curry

सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी

साहित्य : 
१ kg तिस-या (अंदाजे ४०-५० शिंपले )
१ १/२ कप बारीप चिरलेला कांदा
३/४ कप ओलं खोबरं
१ १/२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीप्रमाणे
१ हिरवी मिरची
२-३ आमसुलं
१ अंड (आवडीप्रमाणे)
४ टेबलस्पून तेल

कृती : 
१. तिस-या स्वच्छ धुवून तासभर फ्रीझर मध्ये ठेवा म्हणजे बाहेर काढल्यावर जरा वेळानी त्या आपोआप उघडतील.
२.तिस-या साफ करताना उघडलेले शिंपल्यांची एक बाजू माष्टा सकट तशीच ठेवा. दुस-या बाजूला लागलेले माष्टं काढून घ्या आणि तो शिंपला फेकून द्या.
३. अर्धे शिंपले माष्टं पूर्ण काढून घेऊन फेकून द्या. काही वेळेला शिंपल्यांच्या आतमध्ये छोटे खेकडे असतात ते काढून फेकून द्या.
४. कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्या. हळद, लाल तिखट घालून परता.मग साफ करून ठेवलेल्या तिस-या घालून परता. झाकण ठेवून एक उकळी काढा.
५. ओलं खोबरं आणि आमसुलं घालून परता. शिंपले समुद्रातले असल्याने आधीच खारट असतात त्यामुळे चव बघून गरज वाटली तरच मीठ घाला.
६. १ अंड फोडून घाला आणि नीट मिक्स करा. अंड न घालता केलं तरी खूप छान चव येते. कधीतरी बदल म्हणून अंड घालायला हरकत नाही.कोथिंबीर घालून मिक्स करा आणि १ उकळी काढा.
७. तिस-यांबरोबर साधा भात आणि सोलकढी म्हणजे फारच छान !

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!