साहित्य:
४ कप उभा चिरलेला कोबी
१ टेबलस्पून लिंबूरस
१ १/२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
२ सुक्या लाल मिरच्या
२ सुक्या लाल मिरच्या
५-६ कढीपत्ता पाने
१ टेबलस्पून तेल
कृती:
१. कोबी उभा आणि पात्तळ चिरून घ्या. कोबी ताजा आणि करकरीत असावा.
२. कोबीला मीठ, साखर आणि लिंबूरस लावून हाताने चोळून घ्या.
३. फोडणीच्या कढईत तेल गरम करा आणि तेल चांगले तापले कि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि सुक्या मिरच्या २ तुकडे करून घाला. नंतर कढीपत्ता पाने आणि हिंग घालून कोशिंबिरीला वरून फोडणी द्या.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!