कांदा घालून डाळीची आमटी-kanda ghalun dalichi Aamtee

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी

साहित्य:
१/२ कप तुरीची डाळ
२ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा
१/२ टीस्पून  धने
२ टेबलस्पून ओलं खोबरं
१/२ टीस्पून लाल तिखट
१/४ टीस्पून हळद
२ सोलं (आमसुलं)
3-4 लसूण  पाकळ्या चिरून
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून तेल

कृती:
१. तुरीची डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजवताना त्यात कांदा घाला. धने आणि ओलं खोबरं मिक्सरवर बारीक वाटून घ्या. 
२. तुरीची डाळ शिजली कि चांगली घोटून घ्या. त्यात मीठ, लाल तिखट, हळद, धने आणि खोब-याचं वाटण आणि २ सोलं घाला. आमटी चांगली उकळा.
३. फोडणीच्या कढईत तेल गरम करा आणि तेल चांगले तापले कि लसूण घाला. लसूण गुलाबी झाली कि आमटीला वरून फोडणी द्या.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!