गरम मसाल्याचे पोहे-Garam Masala Pohe

Read this recipe in English
सर्व्हिंग: ४ माणसांसाठी
साहित्य :
६ मुठी पात्तळ पोहे
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप ओलं खोबरं
१/२ टीस्पून धनेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१ १/२ टीस्पून लाल तिखट
१ चिमुट गरम मसाला
२ टीस्पून साखर
मीठ चवीप्रमाणे

कृती : 
१. एका भांड्यात पात्तळ पोहे घ्या. त्यात कांदा, ओलं खोबरं, मीठ, साखर, लाल तिखट, धने-जिरे पूड, गरम मसाला घालून छान कालवून घ्या.
२. खोबरं, मीठ आणि कांद्याच्या ओलसर पणामुळे पोहे ओलसर होतील.
३. पोहे ५ मिनिटे झाकून ठेवा म्हणजे चांगले मुरतील मग सर्व्ह करा.

टीप: पोह्यांवर बारीक शेव घालून सर्व्ह केले कि आणखीन मस्त लागतील.

No comments:

Post a Comment

Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!