साहित्य:
कांद्याची पात १ काडी
१ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा
१ टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा
४ टेबलस्पून ओलं खोबरं
१/२ टीस्पून लाल तिखट
१ कप पाणी
१ सोल (आमसुल)
मीठ चवीप्रमाणे
कृती:
१. कांद्याची पात खालच्या कांद्या सकट बारीक चिरून घ्या.
२. ओलं खोबरं आणि लाल तिखट एकत्र करून मिक्सरवर किंचित गरम पाणी घालून बारीक वाटून घ्या.त्यात बारीक चिरलेला कांदा आणि चिरलेली कांद्याची पात घाला.
३. मिश्रणात १ कप पाणी आणि एक आमसुल घाला. मीठ घालून ढवळा. ५-१० मिनिटांनी आमसुलाचा अर्क उतरेल मग गरम भातावर सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!