सर्व्हिंग: ४ माणसांसाठी
साहित्य:
१ मध्यम भरताचं वांगं
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप दही
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
१-२ हिरव्या मिरच्या
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप दही
१/२ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हिंग
१-२ हिरव्या मिरच्या
१ टेबलस्पून कोथिंबीर
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
कृती:
१. भरताचं वांगं प्रीहीटेड ओव्हन मध्ये किंवा गॅस वर त्याला सुरकुत्या पडे पर्यंत (अंदाजे ३० मिनिटे) भाजून घ्या. ५-५ मिनिटांनी गोल फिरवत राहा म्हणजे सगळ्या बाजूने भाजलं जाईल आणि त्याची साल निघून येईल.गॅस वर भाजले तर सालीचे तुकडे थोडे थोडे निघून येतात.
वांगं पूर्ण भाजलं गेलं आहे याची काटा चमच्याने टोचून खात्री करून घ्या.
२. वांगं थंड झालं कि साल काढून हाताने कुस्करून घ्या.
३. त्यातच कांदा, दही, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
४. फोडणीच्या कढईत तेल गरम करा आणि मोहरी घाला. मोहरी तडतडली कि हिरवी मिरची तुकडे करून घाला. मिरची पांढरी झाली कि कढीपत्ता पाने आणि शेवटी हिंग घालून भरताला वरून फोडणी द्या.
५. हे भरीत भाकरी किंवा पोळी बरोबर साईड डिश म्हणून सर्व्ह करा.

No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!