Read this recipe in English
सर्व्हिंग: २ ते ३ माणसांसाठी
साहित्य:
१ जुडी पालक
३/४ कप दुध
१ टेबलस्पून क्रीम
१/४ टीस्पून मिरपूड
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
३/४ कप दुध
१ टेबलस्पून क्रीम
१/४ टीस्पून मिरपूड
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
कृती:
१. पालकाची पाने खुडून स्वच्छ धुवून घ्या. पातेल्यात १ कप पाणी उकळत ठेवा. उकळत्या पाण्यात धुतलेली पाने टाका.
२. ३-४ मिनिटे तसेच उकळत ठेवा. पालक पूर्ण वाफवला गेला कि, मिक्सरमधून पाण्यासकट काढून त्याची प्युरी करा.
३. प्युरीत अजून १ कप पाणी मीठ साखर आणि मिरपूड घालून उकळी काढा.
४. पालकाला उकळी आल्यावर त्यात उकळतं दुध घाला.सूप नंतर सर्व्ह करायचं असेल तर सर्व्ह करायच्या वेळेस दुध घाला.
५. सर्व्ह करताना वरून क्रीम घाला.
No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!