It is a very famous goan khir cooked with chana daal and coconut milk.
Servings : 2 to 3 Persons
साहित्य :
१/२ कप चण्याची डाळ (हरबरा डाळ)
३ टेबलस्पून तांदूळ
१ कप नारळाचं दुध
५ टेबलस्पून गूळ
५-६ काजू
१/४ टीस्पून वेलची पूड
३-४ बदामाची (सालं काढून) कापं
कृती :
१. कुकरमध्ये नेहमीपेक्षा जास्ती पाणी घालून तांदूळ शिजवा. कुकर थंड झाला कि शिजवलेले तांदूळ घोटून घ्या.
२. चण्याची डाळ बोटचेपी वेगळी शिजवून घ्या. काजू बदाम कोमट पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवा.
३. तांदूळ घोटले कि त्यात नारळाचं दुध, गूळ, वेलची पूड, काजू-बदामाची कापं घालून नीट मिक्स करा आणि शिजवलेली डाळ घालून १ उकळी काढा.
४. जेवताना किंवा जेवण झाल्यावर आवडी प्रमाणे गरम serve करा.
टीप : गुळाची गोडी कमी वाटल्यास १/२ चमचा साखर घाला.
mouth watering!!!
ReplyDelete