सर्व्हिंग: ३ ते ४ माणसांसाठी
साहित्य :
१ कप बासमती तांदूळ
२ कप पाणी (भातासाठी)
१ मध्यम कांदा बारीक चिरून
१ १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
३-४ लसूण पाकळ्या
१-२ हिरव्या मिरच्या
१/४ टीस्पून मिरपूड
१ चिमुट अजिनोमोटो ( MSG )
४ टेबलस्पून तेल
कृती:
१. कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरवर थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्या. एकीकडे तांदूळ धुवून ठेवा.
२. कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा. तेलात कांदा २-३ मिनिटे परतून घ्या. वाटलेला मसाला घालून परता. मसाल्या पुरतेच मीठ आणि अजिनोमोटो घालून पुन्हा १-२ मिनिटे परता.
३. कोथिंबीर आणि कांदयाचे मिश्रण बाजूला काढून ठेवा. कढई स्वच्छ पुसून घ्या. त्याच कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा. तेल तापले कि तांदूळ घालून परता. तांदूळ मोकळा झाला कि २ कप पाणी(तांदुळाच्या दुप्पट पाणी) घाला. मीठ घालून ढवळा आणि भात शिजवून घ्या.
४. भात पूर्ण शिजला कि झाकण काढून गार करत ठेवा. काटा चमच्याने भात वर-खाली करा म्हणजे शीत मोडणार नाही. भात गार झाला कि भातात कोथिंबीर-कांदयाचे मिश्रण आणि मिरपूड घालून मिक्स करा. आणि १ वाफ काढा. आणि गरम सर्व्हकरा.

No comments:
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting 'ruchkarjevan'.
Your comments are valuable to me.
Please feel free to write me Personally at ruchkarjevan@gmail.com
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळ्वा!!!